कोर्सविषयी

टाईम मॅनेजमेंट

या विषयावर कोर्स म्हणजे विषयाची नव्यानं ओळख परिचय. परिचयामुळे अंतर कमी होतं, भीती जाते. अनोळखी गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. एखाद्या विषयाबद्दल ऐकल्यानंतर त्या गोष्टीचा परिचय झाला की मला माहित आहे, मला अनुभव आहे असा आत्मविश्वास मिळतो. ग्रुपमधे आपल्या सारखेच इतरही सहभागी झालेले असतात त्यामुळे शिकण्याची सहज प्रेरणा मिळते. एकेकट्याने प्रयत्न करताना येणारा कंटाळा पळून जातो आणि आपल्यासारखेच इतरही आहेत या जाणिवेमुळे हुरूप वाढतो. इथे कोणतीही परीक्षा नसते कोणतेही परिणाम मिळवण्याची स्पर्धा किंवा लढाई नसते.एखादं कौशल्य शिकण्यासाठी निरपेक्ष वातावरणात गोडी लागणे ही सर्वात चांगली सुरुवात असते आणि चांगली सुरुवातच यशाचे खरे गमक असते.

एखादं कौशल्य शिकण्यासाठी आपण मुद्दाम वेळ, पैसे देतो तेव्हा मनाची तयारी अचूक झालेली असते त्यामुळे शिकण्याची, समजून घेण्याची शक्यता वाढते. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन मिळतो. जुन्या आणि चुकीच्या समजुती असल्याच तर दूर होतात. नवीन माहिती मिळते आणि त्या विषयाकडे नव्याने पहाता येते.

आता वेळ व्यवस्थापनाविषयी थोडेसे. आजपर्यंत या विषयावर अनेक व्याख्यानं आपण ऐकली, पुस्तकं वाचली परंतु कागदावर प्रत्यक्ष वेळापत्रक किंवा नियोजन कुणी करुन दाखवलं का? तज्ञांनी जे सांगितले ते घरी आल्यावर करून पहाताना ज्या अडचणी आल्या त्या मनातल्या मनातच राहिल्या हो की नाही ? आपले प्रश्न आपण कधी विचारले का ? बुद्धीचा विकास आणि बुद्धीचा लगामच मनाला शिस्त लावू शकतो त्यामुळे या कार्यशाळेत हा विषय बुद्धिपूर्वक एकदा समजून घेतला की वर्तनात फरक आपोआप होतो.मनाच्या समजुती बदलल्या की वर्तन बदलतं. वेळेच्या व्यवस्थापनाचे फायदे माहित असूनसुद्धा त्याविषयी असणा-या गैरसमजुतीमुळे अनेकजण त्या दिशेला फिरकत नाहीत आणि smart work  न करता hard work करत बसतात.

यशस्वी लोकं प्रचंड व्यस्त आणि अनियमित जीवन शैलीतही एक प्रकारची शिस्त पाळत असतात ती पद्धती कोणती ? तर रुटीन पाळण्याची. रुटीन कसं पाळावं ? हे शिकल्यावर ध्येय साध्य करण्यासाठी एक जीवन पद्धती मिळते. आपले जगणं सोपं करण्यासाठी,ताण तणाव कमी करण्यासाठी,साधी सोपी तंत्रं शिकण्यासाठी थोडे प्रयत्न करुन पहा.

कोर्सविषयी महत्त्वाचे

  • हा कोर्स एक ट्रेनिंग कोचिंग आहे, शिकण्याच्या आणि अभ्यासाच्या हेतूने आणि तयारीने येणा-यांनाच उपयोग होईल, स्वतः शिकायचे असेल तरच रजिस्ट्रेशन करा.
  • कोणत्याही प्रकारचे कौन्सलिंग केले जात नाही, कौटुंबिक समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत त्यासाठी कृपया कौन्सलर, थेरपिस्ट यांची मदत घ्या ही विनंती.
  • फोनवर कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक संभाषण, गप्पा, चॅटिंग, मैत्री केली जात नाही, संख्या पहाता शक्यही होत नाही.
  • रेकाॅर्डिंग नसतं.
  • कोर्स संपल्यावर 24 तासात मिटिंग्स लिंक आणि माहिती पाठवण्यासाठी तयार केलेला WhatsApp ग्रुप डिलिट केला जातो.

प्रश्न : Time Management मला का शिकायचं आहे ? माझं Why ___

मेंदूला Why कळलं की जे शिकवण्यात येतंय त्यातलं नेमकं काय घ्यायचंय आणि ते जपून ठेवायचंय याची कल्पना येते. शिकण्यात उत्साह आणि गांभिर्य निर्माण होतं.

ट्रेनिंग नावाचा टूलबाॅक्स !

रजिस्ट्रेशन्स म्हणजे साधी गोष्ट नसते, बसल्या बसल्या फोनवर करायची, विचारणा-यांना गॅरेंटी हवी असते जी तीन वर्षात मी दिलेली नाही आणि देत नाही!

Change बदलाची जवाबदारी तर मुळीच घेत नाही,ती तुमची आहे.माझ्याकडे कोणतीही जादू नाही,ना मी स्वतःला तुमचं आयुष्य मॅनेज करणारी जिनियस समजते,मी मेसेंजर आहे माझ्याकडे टूलबाॅक्स आहे.

अगदी आजकाल घरपोच डिलिवरी येते तसं टाईम मॅनेजमेंट एका कोर्सच्या बाॅक्समधे मी देते, बाॅक्स ओपन करायचा, टूल्स आहेत वापर करायचे, काम करायचं.

म्हणूनच कुणी अभिप्राय देतं. कुणी देत नाही. जे चांगला अभिप्राय Feedback देतात त्यांनी स्वतः जे केलं त्याचा रिझल्ट शेअर करतात, मी त्यांचं कौतुक करते बाकीच्या लोकांसारखंच.

https://www.traditionrolex.com/45

तुमचंच कौतुक, तुम्ही बाॅक्स उघडला, काम केलं. स्वतःला बदललं, धडपड केली, छान! कुणी आलेला बाॅक्स घेऊन कोप-यात ठेवला आणि त्यावर धूळमाती जमली तर मी काय करु? कोर्सनंतर Time Management work झालं तर ते माझं कौतुक नसतंच, मी घेत ही नाही.

ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्समधे काय शिकवलं जातं?

सेशन 1

  • स्वयंपाकघराची सिस्टिम कशी तयार करायची?
  • मेनू प्लॅनिंग कसं करायचं?
  • त्यात नियमितता कशी आणायची? स्वयंपाकाला सोयीचं भाजी आणण्याचं रुटीन कसं असावं?
  • मास्टरडायरी/वही का असावी? कशी लिहावी?

सेशन 2

  • घर स्वच्छ आणि आवरलेलं कसं ठेवावं? त्यात नियमितता कशी आणावी? कुणाकडून कामं करवून घ्यायची असतील तर कागदावर नियोजन कसं करावं?
  • कमी वेळात घर ऑर्गनाईज ठेवण्यासाठी महिनाभराचं रुटीन कसं तयार करावं? 
  • एकदम न थकता हळूहळू थोडी थोडी कामं कशी करावी?

सेशन 3

  • मन म्हणजे काय?
  • अंतर्मन कसं कार्य करतं?
  • सवयी कशा बदलता येतील? स्वयंशिस्तीचं रुटीन कसं तयार करायचं? बाह्य प्रेरणेशिवाय स्वतःच उत्साहानं काम कसं करायचं?
  • ट्रॅकर कसा तयार करावा? कसा पाळावा? 

सेशन 4 

  • नोकरी व्यवसाय सांभाळून घराचं व्यवस्थापन कसं करावं?
  • कामांची लिस्ट कशी तयार करायची? प्राधान्यक्रम कसा ठरवायचा?
  • महिन्याचं, आठवड्याचं प्लॅनर कसं तयार करायचं?
  • कसं लिहायचं?
  • रोजचं वेळापत्रक कसं असावं? विश्रांतीसाठी वेळ कसा बाजूला काढता येईल?

सेशन 5 

  • इतरांच्या सहकार्यानं प्रगती कशी करावी?
  • स्वतःशी छान नातं कसं तयार करावं? स्वतःची काळजी कशी घ्यावी?
  • सतत नविन का शिकावं?कसं शिकावं?आत्मविश्वासानं स्वतःची सकारात्मक इमेज कशी तयार करावी? 

सेशन 6

  • ध्येय कसं ठरवावं?कसं लिहावं? सातत्यानं प्रयत्न कसे करावेत?
  • व्हिजन बोर्ड कसा तयार करावा? ध्येयासाठी प्लॅन कसा लिहावा?
  • वही कशी तयार करावी? याशिवाय 
  • एनर्जी टिप्स: थकवा कमी करण्यासाठी 6 महत्वाच्या गोष्टी.
  • टाईम मॅनेजमेंट या विषयातले 6 महत्वाचे नियम.

लेखन कृती, तक्ते तयार करणं, प्रश्नोत्तरं …

यु ट्युब वरील अभ्यासपुर्ण व्हिडिओंची माहिती, अभ्यासासाठी मदतरुप पुस्तकांची नावं… आणि बरंच काही…

  • 3 आठवडे
  • आठवड्यातले 2 दिवस 
  • प्रत्येकी 2 तास 
  • (+ एक ओळख मिटिंग)
  • 12 + तासांचं एकूण ट्रेनिंग 
  • 21 दिवसात आयुष्याची दिशा आणि दृष्टिकोन बदलून भविष्यासाठी मार्गदर्शन देणारा, जुलै 2020 ते जुलै 2024 सातत्याची 4 वर्ष पुर्ण केलेला
  • ध्येय कसं ठरवावं,कसं लिहावं?
  • सवयींचं मानसशास्त्र आणि कायझेन
  • नाती आणि वेळेचं नियोजन,
  • घर आणि करिअर बॅलन्स
  • स्वयंपाक आणि स्वच्छतेचं प्लॅनिंग
  • वेळापत्रक, रुटीन कसं तयार करावं?
  • वेळ नियोजन कौशल्य शिकून आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन
  • हा कोर्स एक अभ्यास आहे,शिकण्याच्या तयारीने येणा-यांनाच उपयोग होऊ शकतो.

टाईम मॅनेजमेंट कोर्ससाठी तयारी

  • हे ग्रुप कोचिंग आहे.अभ्यास आहे.
  • मिटिंग मधे संपुर्ण सहभाग अपेक्षित आहे.
  • प्रश्नोत्तरं,संवाद,लेखन असेल.
  • सेशन दरम्यान व्हिडिओ कॅमेरा बंद ठेवण्याची परवानगी नाही.
  • एका वेळी एका फी मधे फक्त एकच व्यक्ती शिकू शकेल.
  • एखादं सेशन गैरहजर रहाल तर कोर्सची लिंक तुटेल नंतर परत ते सेशन मिळू शकत नाही
  • रेकाॅर्डिंग नसतं
  • लागणारे साहित्य : रफ वही,1 नवी डायरी किंवा फुलस्केप नोटबुक,पेन,एक लहान पाॅकेट डायरी,2मोठे चार्टपेपर
  • मिटिंग Zoom वर घेण्यात येईल.
  • पर्सनल कौन्सलिंग नसतं,वैयक्तिक समस्या/घरगुती प्रश्न सोडवले जात नाहीत.मानसिक समस्या/नैराश्य या सारख्या समस्या असणा-यांनी या अभ्यास-प्रशिक्षणासाठी न येता आधी ट्रिटमेंट पुर्ण करा ही विनंती.
  • प्रेग्नन्सी असेल तर 6 व्या महिन्यानंतर प्रवेश नाही.
  • कोर्स संपताच बॅचसाठी तयार केलेला Whats App ग्रुप डिलिट केला जातो, नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही.
  • टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण जीम मधे व्यायाम करण्यासारखं आहे, रिझल्टसाठी स्वत:च्या आयुष्याची जवाबदारी घेऊन शिकावं लागेल, सराव करावा लागेल.
  • कोर्स सुरु होण्याआधी ओळख करुन घेणे आणि कोर्सचे ध्येय निश्चित करण्यासाठी एक अनौपचारिक मिटिंग असते,नावनोंदणी त्याआधी 24 तास अगोदर करणे आवश्यक आहे.
  • सलग 4 वर्ष 1K+ स्त्रियांनी हा कोर्स केलेला आहे.
  • Page link : https://www.facebook.com/timemanagementpune/

कोर्स साठी रजिस्ट्रेशन फक्त Whats App वर केले जाते, सविस्तर माहीती पाठवली जाते, यासाठी 1. Course Details 2. _____स्वतःचं नाव टाईप करा.

Whats App वर परिचय दिला नसेल तर अनोळखी नंबर असलेला फोन नंबर Receive केला जात नाही.

हा फोन नंबर फक्त ऑनलाईन कोर्स रजिस्ट्रेशन्स साठी आहे. https://wa.me/919689124376

परिचय

कोर्ससाठी फी भरल्यावर एक अनौपचारिक पण अभ्यासपुर्ण अशी Intro Meeting असते. यात प्रत्येकीची साधारण ओळख होते. हेतू असतो Intention Setting.

When you set an intention, it provides accountability and allows you to take control of your personal choices and life.

मग एका प्रवासाला सुरुवात होते, ओळख मिटिंगच्या आधीच एक प्रश्न दिलेला असतो ज्यावर प्रत्येकीनं बोलायचं असतं.

तो म्हणजे, Exercise : रफ वही घ्या, प्रत्येकीनं पुढील प्रश्नाचं उत्तर लिहा,फक्त चार पाच ओळीत लिहिले तरी चालेल.

माझ्या ऑनलाईन टाईम मॅनेजमेंट कोर्सच्या आदल्या दिवशी जरा अनौपचारिक भेटूयात. कोर्सच्या आधी एक ओळख मिटिंग असते.

साधं नाव गाव सांगत ओळख करुन घेऊयात, या दरम्यान ज्या प्रथमच ऑनलाईन जाॅईन होणं शिकताहेत त्यांना जरा अंदाज येईल, mute-unmute कळेल आणि अडजस्ट होता येईल. माझा सहा सेशन्स चा कोर्स अगदी वेळेच्या हिशोबानं तयार केलेला आहे, ९० मिनिटात जास्तीत जास्त विषय पोहोचवण्याचा प्रयत्न असतो, विषयांतर आणि भरकटायला वाव नसतो, त्यामुळे कुणाला पटकन जाॅईन होता आलं नाही किंवा टेक्निकल सराव नसेल तर वेळ वाया जायला नको म्हणून Intro Meeting घ्यायला सुरुवात केली.

ही ओळख मिटिंगच मुख्य आणि प्रभावी असते, वेगवेगळया वयोगटाच्या, ठिकाणच्या, प्रोफेशनमधल्या… आपली ओळख करुन देतात, कोर्स जाॅईन करण्यामागचा उद्देश शेअर करतात तेव्हा खरंतर सगळयाजणींनी हात धरुन एका नव्या प्रदेशात प्रवेश केलेला असतो, तो प्रदेश असतो स्वतःच्या मनातला. इतरांशी ओळख करुन घेता घेता, मी कुठे आहे? मी काय करतेय?मला काय हवंय? अशी स्वतःची ओळख व्हायला सुरुवात होते.

ही मिटिंग माझ्यासाठीही महत्वाची असते कारण प्रश्नांमधून मलाही दिशा मिळते, प्रत्येक बॅचची ठराविक प्रश्नांची गरज ओळखता येते. वैयक्तिक कौन्सलिंग नसतं पण बोलताना पटकन् कुणाला काही आठवणीनं सांगायचंय ते सुचतं.

दर महिन्याला मी ही वाट पहाते या दिवसाची, दर महिन्याला कॅलेंडरवरचं पान बदलताना या महिन्याची बॅच आणि परत तेच ते बोलायचं असं वाटत नाही, कारण समोर नवं आयुष्य नवी कथा असते, मला त्या कथेला त्यांच्याच हातानं आकार द्यायचा असतो आणि शिकायच्या असतात जगण्याच्या रंगांच्या नव्या छटा.

कॅलिडोस्कोपची कोणती रंगसंगती आणि आकार यावेळेस दिसणार आहे? ही उत्सुकता असतेच.

स्वतःचे पालकत्व आणि ब्रम्हांड -अभ्यास

  • मन आणि मेंदू
  • आपल्या समस्यांची कारणं
  • मनाचे रिप्रोग्रॅमिंग
  • इनर चाईल्ड म्हणजे काय?
  • स्वतःचे पालकत्व म्हणजे काय?
  • हिलिंगचे मार्ग
  • लाॅ ऑफ अट्रॅक्शन समज गैरसमज
  • युनिवर्सचे मुख्य नियम
  • आयुष्याची जवाबदारी

कोर्स : नियम रजिस्ट्रेशन आधीच जरुर वाचा.

ऑनलाइन सेशन असेल,व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून प्रत्येक सेशन ला समोर हजर रहावं लागेल. कोणतंही सेशन नंतर परत Repeat मिळणार नाही.

  • रजिस्ट्रेशनची घाई करु नका.
  • आधी तारखा आणि वेळेचं नेमकं नियोजन करा.
  • पात्रता : English आणि मराठी दोन्ही भाषा व्यवस्थित समजणं आवश्यक आहे.
  • संपुर्ण कोर्समधे लेखन,प्रश्नांची उत्तरं लिहिणं या स्वरुपाचा अभ्यास करावा लागेल,दररोज किमान अर्धा तास वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल.
  • कोर्सनंतर कोणत्याही प्रकारचे परत मार्गदर्शन केले जाणार नाही.
  • मानसिक समस्या/नैराश्य या सारख्या समस्या असणा-यांनी या अभ्यास-प्रशिक्षणासाठी न येता आधी ट्रिटमेंट पुर्ण करा ही विनंती.
  • प्रेग्नेंसी असेल तर प्रवेशच नाही.

नांव नोंदणीसाठी संपर्क –  https://wa.me/919689124376

कोर्स साठी रजिस्ट्रेशन

कोर्स साठी रजिस्ट्रेशन फक्त WhatsApp वर केले जाते, सविस्तर माहीती पाठवली जाते. https://wa.me/919689124376

कृपया फक्त  Hi, Hello टाईप न करता  Course Details असं टाईप करा, स्वतःचं नाव पाठवा.

डायरेक्ट फोन करु नका ही विनंती, WhatsApp वर परिचय दिला नसेल तर अनोळखी नंबर असलेला फोन नंबर Receive केला जात नाही.
हा फोन नंबर फक्त ऑनलाईन कोर्स रजिस्ट्रेशन्स साठी आहे.