वेळ व्यवस्थापन प्रशिक्षिका

टाईम मॅनेजमेंट म्हणजे लाईफ मॅनेजमेंट आहे, आपलं आयुष्य आपण मॅनेज नाही करणार तर कोण करणार? समजा दुसरा आपली काळजी घेऊन आपलं आयुष्य नीट आवरुन देत असेल तरी शेवटी तो आपल्या गरजा किती समजू शकणार आहे? आपल्यापेक्षा आपल्याला जास्त कोणी ओळखू शकतं का?
टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे. स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो. यशासाठी जितकी धावपळ, गडबड, पळापळ गरजेची असते तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.
स्त्रियांना कधी कामं करताना पहाल तर दिसेल त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठता-बसतांना दिसतात, कारण कामं चहूदिशेला असतात, एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात. म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा पण न दिसणारा वाटा हेच यश असतं. इतरांना मदत करण्याआधी स्वतःला मदत करणं महत्त्वाचं. स्वतःची काळजी घ्या, कुणाची वाट पाहू नका अपेक्षा ठेऊ नका, जो आधी स्वतःला मदत करतो त्यालाच इतरांची मदत मिळते. परमेश्वर सुध्दा त्यालाच मदत करतो जो आधी स्वतःसाठी सिध्द होतो.
कोर्सविषयी
Time Management मला का शिकायचं आहे ? माझं Why ___
- मेंदूला Why कळलं की जे शिकवण्यात येतंय त्यातलं नेमकं काय घ्यायचंय आणि ते जपून ठेवायचंय याची कल्पना येते.
- शिकण्यात उत्साह आणि गांभिर्य निर्माण होतं.
- मी Change बदलाची जवाबदारी मुळीच घेत नाही, ती तुमची आहे. माझ्याकडे कोणतीही जादू नाही, ना मी स्वतःला तुमचं आयुष्य मॅनेज करणारी जिनियस समजते, मी मेसेंजर आहे माझ्याकडे टूलबाॅक्स आहे.
- टाईम मॅनेजमेंट एका कोर्सच्या बाॅक्समधे मी देते, बाॅक्स ओपन करायचा, टूल्स आहेत वापर करायचे, काम करायचं.
- ज्यांनी स्वतः जे केलं ते त्याचा रिझल्ट शेअर करतात, मी त्यांचं कौतुक करते बाकीच्या लोकांसारखंच.
- तुमचंच कौतुक, तुम्ही बाॅक्स उघडला, काम केलं.स्वतःला बदललं, धडपड केली, छान !
- कुणी आलेला बाॅक्स घेऊन कोप-यात ठेवला आणि त्यावर धूळमाती जमली तर मी काय करु?
- कोर्सनंतर Time Management work झालं तर ते माझं कौतुक नसतंच, ते असतं फक्त तुमचंच कौतुक !
अभिप्राय
विशेष सूचना
2026 पासून ट्रेनिंग कोचिंग व्यवसायात असणाऱ्या,कुणालाही(ट्रेनर/कोच)माझे सेशन्स किंवा कोर्स इतर सहभागी विद्यार्थिनींसोबत करता येणार नाही.
माझ्या ट्रेनिंग कोचिंगच्या व्यवसायात टीम नाही, रिसेप्शनिस्टसुध्दा नाही,मी एकटी हे काम करते, whatsapp वर रजिस्ट्रेशन केले जाते,संपुर्ण काम म्हणजे रजिस्ट्रेशन ते प्रशिक्षण मी स्वतः एकटी करते.
संपूर्ण कोर्स दोन पुस्तकांमधे प्रकाशित झालेला असून पुस्तकातील मजकूर कॉपीराईट आहे.
माझ्या सर्व सेशन्स आणि कोर्स मधील मुद्दे,पध्दत,शैली मी स्वतः डिझाईन केलेली आहे,मी इतर कोणत्याही ट्रेनर कोचच्या मार्गदर्शनानुसार किंवा माॅडेलनुसार काम करत नसून 2020 पासून मी स्वतंत्र माझ्या स्वनिर्मित ट्रेनिंग कोचिंग व्यवसायात आहे,याच विषयावर मी लेखन करते.
माझ्या प्रशिक्षणाला,अभ्यासक्रमाला कॉपी करण्याची,कोणत्याही प्रकारे माझ्या नावाचा वापर करून इतरांना शिकवण्याची,कोणालाही माझी परवानगी नाही.
©कांचन दीक्षित




