
ईएमआय चा प्लॅन मार्च 2026 पासून
⭐ Total Course Fee: ₹10,000
Each Part = 2 Days | 2 Hours per Day (प्रत्येक भाग 2 दिवस प्रत्येकी 2 तासाचे)
| Part | Topic | Duration | Fee |
|---|---|---|---|
| Part 1 | Mind | 2 Days | ₹2000 |
| Part 2 | Inner Child | 2 Days | ₹3000 |
| Part 3 | Hooponopono | 2 Days | ₹2000 |
| Part 4 | Law Of Attraction | 2 Days | ₹3000 |
📌 Note : All parts must be completed in sequence, but you can complete them in different months at your convenience.
(4 भाग सुटे सुटे स्वतःच्या सोयीच्या महिन्यात (पण क्रम पाळून) कधीही पुर्ण करता येईल.)

मंगळ : बुध बॅच
OR
शनि : रवि बॅच
(दर महिन्याला यापैकी फक्त एक बॅच असेल)
Morning : 10 AM – 12 PM
OR
Evening : 4 PM – 6 PM
नावनोंदणी सुरु आहे.
https://wa.me/919689124376
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11

या विषयावर कोर्स म्हणजे विषयाची नव्यानं ओळख परिचय. परिचयामुळे अंतर कमी होतं, भीती जाते. अनोळखी गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. एखाद्या विषयाबद्दल ऐकल्यानंतर त्या गोष्टीचा परिचय झाला की मला माहित आहे, मला अनुभव आहे असा आत्मविश्वास मिळतो. ग्रुपमधे आपल्या सारखेच इतरही सहभागी झालेले असतात त्यामुळे शिकण्याची सहज प्रेरणा मिळते. एकेकट्याने प्रयत्न करताना येणारा कंटाळा पळून जातो आणि आपल्यासारखेच इतरही आहेत या जाणिवेमुळे हुरूप वाढतो. इथे कोणतीही परीक्षा नसते कोणतेही परिणाम मिळवण्याची स्पर्धा किंवा लढाई नसते.एखादं कौशल्य शिकण्यासाठी निरपेक्ष वातावरणात गोडी लागणे ही सर्वात चांगली सुरुवात असते आणि चांगली सुरुवातच यशाचे खरे गमक असते.
एखादं कौशल्य शिकण्यासाठी आपण मुद्दाम वेळ, पैसे देतो तेव्हा मनाची तयारी अचूक झालेली असते त्यामुळे शिकण्याची, समजून घेण्याची शक्यता वाढते. एखाद्या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोन मिळतो. जुन्या आणि चुकीच्या समजुती असल्याच तर दूर होतात. नवीन माहिती मिळते आणि त्या विषयाकडे नव्याने पहाता येते.
आता वेळ व्यवस्थापनाविषयी थोडेसे. आजपर्यंत या विषयावर अनेक व्याख्यानं आपण ऐकली, पुस्तकं वाचली परंतु कागदावर प्रत्यक्ष वेळापत्रक किंवा नियोजन कुणी करुन दाखवलं का? तज्ञांनी जे सांगितले ते घरी आल्यावर करून पहाताना ज्या अडचणी आल्या त्या मनातल्या मनातच राहिल्या हो की नाही ? आपले प्रश्न आपण कधी विचारले का ? बुद्धीचा विकास आणि बुद्धीचा लगामच मनाला शिस्त लावू शकतो त्यामुळे या कार्यशाळेत हा विषय बुद्धिपूर्वक एकदा समजून घेतला की वर्तनात फरक आपोआप होतो.मनाच्या समजुती बदलल्या की वर्तन बदलतं. वेळेच्या व्यवस्थापनाचे फायदे माहित असूनसुद्धा त्याविषयी असणा-या गैरसमजुतीमुळे अनेकजण त्या दिशेला फिरकत नाहीत आणि smart work न करता hard work करत बसतात.
यशस्वी लोकं प्रचंड व्यस्त आणि अनियमित जीवन शैलीतही एक प्रकारची शिस्त पाळत असतात ती पद्धती कोणती ? तर रुटीन पाळण्याची. रुटीन कसं पाळावं ? हे शिकल्यावर ध्येय साध्य करण्यासाठी एक जीवन पद्धती मिळते. आपले जगणं सोपं करण्यासाठी,ताण तणाव कमी करण्यासाठी,साधी सोपी तंत्रं शिकण्यासाठी थोडे प्रयत्न करुन पहा.

प्रश्न : Time Management मला का शिकायचं आहे ? माझं Why ___

मेंदूला Why कळलं की जे शिकवण्यात येतंय त्यातलं नेमकं काय घ्यायचंय आणि ते जपून ठेवायचंय याची कल्पना येते. शिकण्यात उत्साह आणि गांभिर्य निर्माण होतं.
ट्रेनिंग नावाचा टूलबाॅक्स !
रजिस्ट्रेशन्स म्हणजे साधी गोष्ट नसते, बसल्या बसल्या फोनवर करायची, विचारणा-यांना गॅरेंटी हवी असते जी तीन वर्षात मी दिलेली नाही आणि देत नाही!
Change बदलाची जवाबदारी तर मुळीच घेत नाही,ती तुमची आहे.माझ्याकडे कोणतीही जादू नाही,ना मी स्वतःला तुमचं आयुष्य मॅनेज करणारी जिनियस समजते,मी मेसेंजर आहे माझ्याकडे टूलबाॅक्स आहे.
अगदी आजकाल घरपोच डिलिवरी येते तसं टाईम मॅनेजमेंट एका कोर्सच्या बाॅक्समधे मी देते, बाॅक्स ओपन करायचा, टूल्स आहेत वापर करायचे, काम करायचं.
म्हणूनच कुणी अभिप्राय देतं. कुणी देत नाही. जे चांगला अभिप्राय Feedback देतात त्यांनी स्वतः जे केलं त्याचा रिझल्ट शेअर करतात, मी त्यांचं कौतुक करते बाकीच्या लोकांसारखंच.
तुमचंच कौतुक, तुम्ही बाॅक्स उघडला, काम केलं. स्वतःला बदललं, धडपड केली, छान! कुणी आलेला बाॅक्स घेऊन कोप-यात ठेवला आणि त्यावर धूळमाती जमली तर मी काय करु? कोर्सनंतर Time Management work झालं तर ते माझं कौतुक नसतंच, मी घेत ही नाही.

लेखन कृती, तक्ते तयार करणं, प्रश्नोत्तरं …
यु ट्युब वरील अभ्यासपुर्ण व्हिडिओंची माहिती, अभ्यासासाठी मदतरुप पुस्तकांची नावं… आणि बरंच काही…
या ट्रेनिंग कोर्सची विद्यार्थ्यांची तसेच स्त्री, पुरुष एकत्र अशीही बॅच पुरेशी संख्या जमली की घेतली जाईल.
ग्रुप कोचिंग आहे,पर्सनल कौन्सलिंग नसतं,वैयक्तिक समस्या/घरगुती प्रश्न सोडवले जात नाहीत.मानसिक समस्या/नैराश्य या सारख्या समस्या असणा-यांनी या अभ्यास-प्रशिक्षणासाठी न येता आधी ट्रिटमेंट पुर्ण करा ही विनंती.
प्रशिक्षणासह
✅️+ 2 व्हिडिओ (कायमस्वरुपी)
✅1)️ मेनू प्लॅनिंग आणि किचन ऑर्गनायझेशन
✅️2) क्लिनिंग रुटीन स्वच्छतेचे नियोजन याशिवाय,
✅️चार्ट आकृत्यांचे फोटो, यु ट्युब वरील उपयुक्त व्हिडिओ लिंक्स
Type : Course details
हा कोर्स एक अभ्यास आहे, शिकण्याच्या तयारीने येणा-यांनाच उपयोग होऊ शकतो.
1) हे ग्रुप कोचिंग आहे. अभ्यास आहे.
मिटिंग मधे संपुर्ण सहभाग अपेक्षित आहे.
2) प्रश्नोत्तरं, संवाद, लेखन असेल.
सेशन दरम्यान व्हिडिओ कॅमेरा बंद ठेवण्याची परवानगी नाही. दोन्ही सेशन्स चे रेकॉर्डिंग नंतर मिळणार नाही.
एका वेळी एका फी मधे फक्त एकच व्यक्ती शिकू शकेल.
3) लागणारे साहित्य : रफ वही,1 नवी डायरी किंवा फुलस्केप नोटबुक,पेन,एक लहान पाॅकेट डायरी,2मोठे चार्टपेपर
4) मिटिंग Zoom वर घेण्यात येईल.
कोर्स संपताच बॅचसाठी तयार केलेला Whats App ग्रुप डिलिट केला जातो,नंतर कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही.
Page link : https://www.facebook.com/timemanagementpune
सलग 5 वर्ष 2K+ स्त्रियांनी हा कोर्स केलेला आहे,
टाईम मॅनेजमेंट प्रशिक्षण जीम मधे व्यायाम करण्यासारखं आहे,रिझल्टसाठी
स्वत:च्या आयुष्याची जवाबदारी घेऊन शिकावं लागेल,सराव करावा लागेल.
कोर्स साठी रजिस्ट्रेशन फक्त Whats App वर केले जाते,सविस्तर माहीती पाठवली जाते,यासाठी
1) Course Details
2) ___स्वतःचं नाव टाईप करा.
Whats App वर परिचय दिला नसेल तर अनोळखी नंबर असलेला फोन नंबर Receive केला जात नाही.
हा फोन नंबर फक्त ऑनलाईन कोर्स रजिस्ट्रेशन्स साठी आहे.



कोर्स : नियम रजिस्ट्रेशन आधीच जरुर वाचा.
ऑनलाइन सेशन असेल,व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून प्रत्येक सेशन ला समोर हजर रहावं लागेल. कोणतंही सेशन नंतर परत Repeat मिळणार नाही.
नांव नोंदणीसाठी संपर्क – https://wa.me/919689124376

कोर्स साठी रजिस्ट्रेशन फक्त WhatsApp वर केले जाते, सविस्तर माहीती पाठवली जाते. https://wa.me/919689124376
कृपया फक्त Hi, Hello टाईप न करता Course Details असं टाईप करा, स्वतःचं नाव पाठवा.
डायरेक्ट फोन करु नका ही विनंती, WhatsApp वर परिचय दिला नसेल तर अनोळखी नंबर असलेला फोन नंबर Receive केला जात नाही.
हा फोन नंबर फक्त ऑनलाईन कोर्स रजिस्ट्रेशन्स साठी आहे.