नमस्कार
माझं नाव कांचन दीक्षित, वेळ व्यवस्थापन प्रशिक्षिका (Time Management Trainer) आहे. मराठी विषयात एम.ए. पुर्ण केल्यावर खाजगी शिक्षण संस्थेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवलं. ‘वेळेचं नियोजन’ या विषयाचा अभ्यास करणं हाच माझा छंद होता. स्वतःच पुस्तकं आणून यु-ट्युब वर व्हिडिओ पहात अभ्यास केला, वेळापत्रकं तयार केली, स्वतःला तसं वागता येतंय का? हे तपासत प्रयोग केले शेवटी सोपी पध्दत जमली वेळापत्रक पाळता येऊ लागलं. मग नोट्स एकत्र करुन एक कोर्स होईल ईतके मुद्दे तयार केले.
फेसबुक पेज सुरु केलं आणि पोस्टस् लिहिल्या फक्त वेळ व्यवस्थापन हा विषय केंद्रस्थानी ठेऊन. खूप कमेंटस मिळाल्या कौतुक झाले. ओळखी वाढल्या आणि मला लोकं प्रश्न, समस्या विचारु लागले. गृहिणींसाठी ‘वेळ नियोजन’ यावर मालिका लिहिली. स्वयंपाकघराचे नियोजन, मेनू प्लॅनिंग, भाज्यांचे नियोजन, व्यायामाला वेळ कसा काढावा? असे विषय टेक्निकची जोड देत लिहिले, याला ग्रुपवर छान प्रतिसाद मिळाला. सुव्यवस्थित रचना (organization) करणे हा आणखी एक छंद, मग यावर कपडे कपाट कसे आवरावे?किचन कसे लावावे?असे विषय समजावून सांगितले.
मी I m a Certified NLP Coach and Time Management Trainer आहे. लेखनासोबत आता कोर्स घेते यात वेळ व्यवस्थापन, ध्येय कसे ठरवावे? नियोजन कसे करावे? व्हिजन बोर्ड कसा तयार करावा? सवयी कशा बदलाव्यात/चांगल्या सवयी कशा लावून घ्याव्यात याविषयी मार्गदर्शन करते. स्त्रियांसाठी ऑनलाईन कोर्स घेते कोर्स, व्याख्यान यातून या विषयाबद्दल जागृती निर्माण करुन सर्वांचे जगणे सोपे व्हावे यासाठी प्रयत्न करतेय.
आपण ही ह्या कोर्सला सहभागी होऊ शकता. त्यासाठी whatsapp संपर्क साधू शकता.