स्विकार

जे आहे ते स्विकार कर!Accept it!

एखाद्याची समजूत काढताना, धीर देताना, असा सल्ला ब-याचदा दिला जातो, आपणही घेतो, देतो. बोलणं सोपं असतं, हे स्विकारणं कठिण असतं. हे स्विकारणं म्हणजे,

  • व्यक्ती किंवा परिस्थितीपुढे नमणं स्वतःची मतं,
  • विचार संपवणं.
  • माघार घेणं.
  • अन्याय सहन करणं
  • मान्य करणं
  • हार मानणं

अशा अर्थानं घेतलं जातं, थोडक्यात संपुर्ण पराजय स्विकारुन गप्प बसणं म्हणजे स्विकार करणं असा आपला समज असतो.

माझ्या एका Mentor ने एक गोष्ट सांगितली होती तिच्या मदतीनं आज आपण स्विकार करणं म्हणजे काय ते समजून घेऊ. एका गावात सोनाराचं छोटंसं दुकान होतं, ब-याचदा गावातल्या वयस्कर स्त्रिया दुरुस्तीचं किंवा काहीतरी बारिकसारीक काम घेऊन याच्याकडे यायच्या जुन्या कापडाच्या पुरचुंडीत, छोट्याशा डबीत, वेढण्या, साखळया यांचा गुंता असायचा. ते पाहून सोनार जाम चिडायचा कारण काम करण्यापुर्वी हा गुंता सोडवत बसायचा त्याला कंटाळा यायचा, नाही म्हणता यायचं नाही आणि रागारागात गाठी आणखी पक्क्या व्हायच्या. अधूनमधून त्याची बायको घरचं काम आटोपून मदतीला यायची, ती मात्र चुटकीसरशी या गाठी सोडवायची, तो तिच्या या कामानं आश्चर्यचकित व्हायचा. ती हसत कापड अंथरुन त्यावर सगळा गुंता ठेवायची, मग क्षणभर डोळे मिटून कामाला सुरुवात करायची.

एकदा त्यानं विचारलं, “तू कशी गं सहज सोडवतेस या एकमेकात अडकलेल्या साखळ्या ? काय बोलतेस मनात ?” ती म्हणाली, “मी आधी त्यांना म्हणते, मी तुमचा स्विकार करते मग शांतपणे कामाला सुरुवात करते ” स्विकार म्हणजे नकाराच्या विरुध्द ! आपण व्यक्ती परिस्थिती नाकारत असतो  आणि आपल्याला बदलही हवा असतो. दोन्ही कसं शक्य आहे? यात गुंता आणखी वाढतो. बदलासाठी म्हणजे गुंता सोडवण्यासाठी आधी स्विकार करणं म्हणजे समस्या हातात घेणं, जवाबदारी घेणं. लेख प्रायोजित आमच्या रंगीबेरंगी, चमकदार आणि स्टायलिश सॉक्सच्या संग्रहात प्रत्येकासाठी काहीतरी शोधा. तुमच्या ड्रॉवरमध्ये रंग जोडण्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा बंडलमध्ये खरेदी करा!

जसं आहे तसं स्विकारणं ही समस्या सोडवण्याची पहिली महत्वाची स्टेप आहे, तीच टाळून ब-याचदा आपण उपाय शोधत फिरतो आणि फुकट दमतो. वर्षानुवर्ष समस्येशी लढतोय पण ती सुटतच नाहीये यामागे मनात काय आहे ते तपासा.

(उदा. सोनार मनात पुटपुटतो, “या बायका अशा साखळयांचा गुंता का करतात? नीट ठेवता येत नाही का?साधं कळत नाही का?अडाणी लोकं नुसती…!)

  • असं होऊच कसं शकतं!
  • असं झालंच कसं!
  • मीच का!
  • मलाच का!

मनात अजून हेच चाललं असेल तर अजून आपण समस्येचा आहे तसा स्विकारच केलेला नाहीये हे कळेल. स्विकार केल्यानं वास्तव स्पष्ट दिसायला लागतं, जवाबदारी घेतल्यानं आतून बळ मिळतं आणि मार्ग दिसू लागतात. ब्रम्हांडही मदत करायला लागतं कारण कामाला सुरुवात झाली कळताच आता नेमकी कोणती मदत पाठवायची हे त्याला स्पष्ट होतं, कदाचित या स्विकाराच्या स्पष्टतेचीच वाट पहात ते थांबलेलं असतं.

©कांचन दीक्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *