पुस्तक

प्रसिद्ध लेखिका कांचन दीक्षित लिखित आणि साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित

 ‘माईंड ॲण्ड सेल्फ मॅनेजमेंट’ आणि  ‘टाईम आणि सेल्फ मॅनेजमेंट’

 या दोन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार 19 ऑक्टोबर ला पुणे येथे झाले,त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मेधा खासगीवाले बोलत होत्या. 

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चर सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर साकेत प्रकाशनच्या संचालिका प्रतिमा भांड, लेखिका कांचन दीक्षित आणि डॉ. जयंत बरीदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मेधा खासगीवाले म्हणाल्या की, मन हे न दिसणारे परंतू आपल्या शरीराशी निगडीत महत्त्वाचा घटक आहे. अनेक शारीरिक आजारांचे मूळ आपल्या मानसिक  स्थितीत आढळून येते. आपणच आपल्या मनाला प्रशिक्षीत करणे आणि त्याला प्रयत्नपूर्वक शिस्त लावणे आवश्यक आहे. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार घटक प्रामख्याने काम करत असतात. भावनांचा निचरा न होणे हे विविध मानसिक आणि शारीरिक व्याधींचे मूळ कारण असते.

यावेळी बोलताना, डॉ. जयंत बरीदे त्यांच्या  मनोगतात म्हणले की, प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल दडलेले असते. आपले वय कितीही झाले तरी आपल्यावर वय वर्षे ८० राज्य करते की आपल्यातील वयोवर्षे २० राज्य करते हे अधिक महत्त्वाचे असते. 

यावेळी बोलताना लेखिका कांचन दीक्षित म्हणाल्या की, मानवी मेंदू हा टप्प्या टप्याने उत्क्रांत होत गेला आहे. भीतीला सर्वप्रथम प्रतिसाद देणे हे त्याची प्राथमिकता असते. याच थेट्र आणि डेंजर संवेदनांना प्रतिसाद देण्यात आणि त्याचे व्यवस्थापन करण्यात त्याची बरीचशी ऊर्जा खर्ची पडते त्यामुळे आपली स्वप्ने आणि ध्येय साध्य करण्यात लागणारी पुरेशी ऊर्जा मेंदूकडे शिल्लक राहत नाही. 

यावेळी साकेत प्रकाशनाच्या संचालिका प्रतिमा भांड यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी साळवेकर यांनी केले. 

‘टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट’ प्रकाशन

पुण्याच्या भावार्थ येथे सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा. लि. कंपनीचे सीईओ राजेश मंडलिक आणि मुंबई विद्यापीठ व हॅनोव्हर विद्यापीठाच्या संशोधक डॉ. वैदेही लिमये यांच्या हस्ते साकेत प्रकाशित आणि कांचन दीक्षित लिखित ‘टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. कांचन दीक्षित या महाराष्ट्रामधील प्रख्यात टाइम मॅनेजमेंट ट्रेनर आहेत. या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रकाशनाआधीच या पुस्तकाने Amazon च्या टॉप १०० पुस्तकांमध्ये ५३ वे स्थान मिळवले आहे.

कृतज्ञ

आज माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे. माझं पुस्तक प्रकाशित झालं आहे.

फेसबुकवरील सर्व वाचकांनी माझ्या लेखनाला भरभरुन प्रेम दिलं, सलग पाच सहा वर्ष वाचकांच्या सोबतीनं शिकण्याचा आणि शिकवण्याचा हा माझा प्रवास सुरु आहे. फेसबुक स्नेहीपरिवाराचं कौतुक हे माझ्या पुस्तकाचं कारण आहे, सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच हे स्वप्न साकार झालेलं आहे.

माझ्या सर्व विद्यार्थिनींचे मनापासून आभार, त्यांच्या शुभेच्छांमुळेच मला लेखनासाठी उत्साह आणि बळ मिळालं.

साकेत प्रकाशनानं माझं पुस्तक छापण्याचा निर्णय आणि पुढाकार घेतला तो दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा होता, आपल्या नात्यातल्या माणसांनी आपुलकीनं शाबासकी द्यावी आणि आपण निवडलेल्या कामाची दखल घेत पुढे जाण्यासाठी बळ द्यावं असाच हा अनुभव होता.


साकेत प्रकाशनाचं आजवरचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की या प्रकाशनाच्या विशाल कुटुंबात इतर मान्यवर लेखकांसोबत आता आपलंही नाव असणार या विचारांनीच मी आनंदून गेले होते.

या पुस्तकाच्या निर्मितीसाठी संपादक मंडळानं अप्रतिम कामगिरी केलेली आहे. पुस्तकाच्या प्रत्येक पैलूवर अतिशय कौशल्यानं आणि प्रेमानं संस्कार केलेले आहे. प्रत्येक शब्दासाठी, अर्थपुर्ण वाक्यासाठी, नेमक्या बांधणीसाठी कौशल्य पणाला लावलेलं आहे.

साकेत प्रकाशनाच्या प्रमुख प्रतिमाताई भांड यांनी अतिशय प्रेमानं ही जवाबदारी पार पाडलेली आहे. टिमचेही मी मनापासून आभार व्यक्त करत आहे. या पुस्तकासाठी सर्वांनी उत्कृष्ट सहकार्य आणि योगदान दिलेलं आहे. जर तुम्ही सुपरक्लोनसाठी बाजारात असाल तर, सुपर क्लोन रोलेक्स हे जाण्याचे ठिकाण आहे! ऑनलाइन बनावट रोलेक्स घड्याळांचा सर्वात मोठा संग्रह!

या पुस्तकासाठी मा.अश्विनीताई मयेकर यांनी सुरेख प्रस्तावना लिहून दिलेली आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार.

मा.राजेश मंडलिक सरांनी पुस्तकासाठी अभिप्राय लिहून दिला यासाठी त्यांचे मनापासून आभार.
या दोन्ही मान्यवरांनी दिलेल्या आशिर्वादाचं मोल मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.

आजवर फेसबुक पोस्टसमुळे माझ्या अभ्यासाला आणि लेखनाला प्रोत्साहन मिळत गेलं तसंच प्रेम माझ्या पुस्तकालाही सर्व वाचकांकडून मिळेल अशी खात्री मला वाटते.

ऑनलाईन कोर्स वेगळाच आहे, ते 12 तासांचं प्रशिक्षण आहे. पुस्तक परिपुर्ण असलं तरी ट्रेनिंग हा विषयच वेगळा आहे. कोर्सचं पुस्तक केलेलं नाही तर, पाच वर्ष मी लिहितेय त्या लेखनाचं पुस्तक केलेलं आहे.

माझा आजवरचा अभ्यास, विचार आणि टाईम मॅनेजमेंट या विषयाचं महत्व पटवून देण्याची तळमळ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता पुस्तक सज्ज आहे, पुस्तक Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

जरुर वाचा आणि अभिप्राय कळवा.

पुस्तक सर्व पुस्तकांच्या दुकानात उपलब्ध आहे. पुणे साकेत प्रकाशन बुक गॅलरी इथे मिळेल.

‘टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट’ पुस्तकाची पाचवी आवृत्ती

ऑक्टोबर 2023 मधे पुस्तक प्रकाशित झालं आणि आता पुस्तकाची पाचवी आवृत्ती आलेली आहे. मिळणा-या प्रतिसादाने भारावून गेले आहे,

सर्व ज्ञात अज्ञात 5000 वाचकांचे मी मनापासून आभार मानते आहे,वाचत रहा,शुभेच्छा असू द्या.

©कांचन दीक्षित