Namaste everyone,
This would be our last class today but there is certainly so much to do on our part.
Kanchan Ma’am has given us a treasure cove and we have to find what’s best for us.
Kanchan Ma’am has really opened doors for a whole new world.I always used to think that other women don’t struggle with keeping their houses clean or serving meals on time but that was a wrong notion.Those who have clean houses can also suffer from lack of energy or time for themselves. First two classes paved the way to our self-development and Kanchan Ma’am you have so many different tools to get over the hurdles which stop us from becoming the best version of self.
One more thing, I observed yesterday is that every one in the course has a different glow to their skin including myself. My son actually complimented me yesterday just before the class ,”Mumma your skin is glowing and it doesn’t feel like you just cooked.”
I think this glow is of hope to achieve something great and confidence to get over the hurdles and last but not the least of self-love.
Congratulations ladies! Keep glowing and all the best to each and everyone.
Thanks a lot to you Kanchan Ma’am for making us see the world in a whole new different light . Thanks to all my course mates for sharing your thoughts and stories to inspire me so much.
Arunima Pohali
एप्रिल 2023
Time management च्या course ची माहिती अनेक वर्षे माझ्या समोर येत होती कारण मी तुम्हाला fb वर follow करत होते. तुमचे लेख मी नियमित वाचते आणि मला ते अगदी मनापासून आवडतात.FB वर येण्याचं कारण तुमचे लेख च आहे. कारण आधी सारखं craze राहील नाही आता FB चं.
पण तरी सुद्धा time management course बद्दल वाचून मी सोडून द्यायचे.
कारण मला वाटायचं हा course माझा साठी नाहीये. कारण मी तर organized आहे (course करे पर्यंत असं वाटत होत मला) आणि माझा work from home चा जॉब, बेसिक कामासाठी बाई आहे आणि अजून मुलांची जबाबदारी नाही, त्यामुळे माझा कडे तर भरपूर वेळ आहे मला कशाला लागतंय हे management
पण माझ्या ओळखी मध्ये कोणी अशी तक्रार करत असेल कि अगं वेळच मिळत नाही. दिवस असा जातो बघ त्यांना मी अगदी विश्वासाने सांगायची कि तुम्ही कांचन दीक्षित यांचा time management course करा खूप फायदा होईल. मी त्यांचे लेख वाचते खूप उपयोग होतो मला.
मग एक दिवस मला वाटलं कि सगळ्यांना सांगत फिरते कि हा course करा म्हणून मग मी का करून बघू नये.
मान्य आहे आता माझा कडे भरपूर वेळ आहे पण पुढे मला याची गरज वाटणारच आहे मग आता वेळ आहे तर करूयात की ज्याचे फक्त लेख वाचून बरेच मार्गदर्शन मिळाले आहेत मग course मध्ये पण नक्कीच काहीतरी नविन आणि उपयोगी शिकायला मिळेल आणि खरंतर मला कांचन ताईंचा आवाज ऐकायचा होता त्या कशा बोलतात कशा राहतात याचीही उत्सुकता होती.
मग ठरवलं करायचा course आणि केलं enroll. क्लास चा पहिल्या दिवशीच मी तुमची फॅन झाले. तुमचा आवाजात खूप positivity आहे. प्रत्येक क्लास खूप विचार पूर्वक तयार केला आहे. ज्याला kitchen, cooking रटाळ वाण वाटत असेल त्याला हि या कोर्से नंतर आवड निर्माण होते.
असं नाही कि मला law of attraction, affirmation , हॉपोनोपोनो या techniques माहीती नव्हत्या.कारण you -tube वर हे सगळं मिळत. पण या क्लास मध्ये जे फक्त ऐकत आले आहे पण प्रश्नाची उत्तर मिळाली नाही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. खूप concepts clear झाल्या. You -Tube किंवा पुस्तकानातुन फक्त माहिती मिळत होती पण या course मुळे विषयावर चर्चा करता आली.
प्रत्येक क्लास नंतर मनात Life is Beautiful हे पक्कं होत गेलं. खरंतरं मला स्त्री जन्माचाच अभिमान वाटायला लागला आहे कारण तुम्ही इतकं छान गणित मांडून दिल आहे की आपल्याला सगळं करायचं आहे आपला संसार , करिअर पण त्या सगळ्यातून आनंद घेत करायचं आहे. आणि ते कसं हेच तुम्ही सांगता. मी या क्लास मधून काय शिकले तर life is beautiful, you just have to be little bit disciplined and organized. मी वाट पाहते आहे कि तुम्ही आता LOA वर कधी course सुरु करताय ते. तुम्ही कुठलेही course सुरु केले तर मी ते नक्की करेल.
मीरा कुलकर्णी, पुणे
कांचन मॅडम,
सर्वात प्रथम तुमचे मनापासून आभार. तुम्ही खुप छान काम करताय. तुमचा खूप मोठा अभ्यास आहे हे कोर्स करताना दिसून येतंय. माझ्या कडे शब्दच नाहीत. कोणत्या शब्दात तुमचं कौतुक करू.
एका खोलीत खूप पसारा असतो आणि ती खोली आवरल्या वर आपल्याला किती छान वाटतं तसच मनातला, डोक्यातला सगळा पसारा organised झालाय. डोक आणि मन खूप मोकळं झालंय. नव्या दृष्टीने मी सगळी कडे पाहतेय. काही तरी नवीन करायचे असेल तर आधी आपले मन आणि डोक मोकळं पाहिजे आणि ते हया कोर्स मुळे झालंय. तुमच्या पोस्ट पाहूनच तुमचा कोर्स नक्कीच चांगला असेल हा विश्वास होता.
या पेक्षा ही खूप काही मनात आहे तुमचं कौतुक करायला पण शब्द सुचत नाहीत.
माझ्या आयुष्यात आल्या बद्दल thank you.
काजल गायकवाड, गोरेगाव – मार्च 2023
Gm ताई
तू सांगितले होते व्यायामाचे नियोजन
ताई त्यामुळे अगदी रोज नाहीतरी आठवड्यातले 4 दिवस मी बाहेर चालायला जाते आहे गेले 3 महिने झाले आणि त्याचा परिणाम माझं वाढलेले Hba1c कमी झालय इंच लॉस झाला .
अगदी वार ठरवले नाहिये पण आठवड्यातले 4 दिवस 1 तास चालायचे असे ठरवले.तू सांगितलेल्या गोष्टी जेव्हा आचरणात आणून त्याचे परिणाम दिसतात तेव्हा खूप आनंद होतो.
राजेश्वरी कपिश जोशी, पुणे – May 2022 बॅच
कांचन ताईं तुम्ही हा कोर्स डिझाईन करतांना महिलांचा, त्यांच्या समस्यांचा, त्यांच्या जवाबदाऱ्या, त्यांची विचार प्रक्रिया, जडणघडण,अंगीभूत गुण या सगळ्यांचा खूप सखोल विचार केला आहे त्यामुळे हा कोर्स करणारी प्रत्येक स्त्री काही तरी नक्कीच आत्मविश्वासाने शिकून जाते. शिकवण फक्त त्या स्त्री पुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला फायदा होतो. कोर्स चे टॉपिक जरी फिक्स असले तरी तुमचं बोलणं कितीतरी विषयांना स्पर्शून जातं. ताई तूम्ही हातचं काहीच न राखता शिकवता जणू काही पेटारा उघडुन ठेवला आहे जिला जे जे लागतं तिनं ते ते घेऊन जावे. तुम्ही मॅजिक टूल्स दिले आहेत स्वतःवर प्रामाणिक पणे काम करणाऱ्या प्रत्येकीच्या आयुष्यात ‘ जादू ‘ ही नक्कीच घडणारं आहे. तुमच्या कडून पुढेही असेच कोर्सेस शिकण्याची संधी मिळावी आणि आयुष्य समृद्ध करता यावे ही या ब्रम्हांडाला प्रार्थना
मनापासुन प्रेम आणि आभार.
© प्राजक्ता आदमने कारू, नागपूर
काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. एक साधारण तिशीची MBA शिकलेली तरुणी स्वैपाक कसा करावा हे एका बाईंकडे शिकायला येते त्याचा अनुभव होता. मोहरी कशी तडतडते, किंवा गॅस कमी जास्त कधी करायचा हेही ह्या उच्चशिक्षित हुशार तरुणीला माहिती नाही. मग आमच्या सगळ्या निरक्षर, अर्धशिक्षित किंवा फार तर सुशिक्षित बायकाच बऱ्या. आमची बुद्धिमत्ता किती असाधारण असावी मग? असा काहीसा सूर होता.
मला माझे नुकतेच लग्न झाले ते दिवस आठवले.
दोनच दिवसात management college मध्ये शिकवणं अगदीच सोपं. पण घराचं व्यवस्थापन अगदीच अशक्य अशी माझी समजूत झाली. सासरी काय करशील मग? हा आईचा प्रश्न किती महत्त्वाचा होता हे कळायला लागलं.
पण परत माहेरी जाते आणि शिकून घेते असं म्हणण्याची सोय नव्हती. त्यामुळे सासऱ्यांच्या हाताखाली मी हळुहळू शिकायला लागले. (हो सासरे. कारण माझ्या सासूबाई bed ridden होत्या.)आपल्याकडे लग्नात बँड वाजतो. माझ्या लग्नात बँड नाही वाजला. पण रोज किचन आणि घराचे व्यवस्थापन करताना माझाच बँड वाजायला लागला होता. कसं तरी करून दिवस काढले खरे.
पण इतकी हुशार मी. पण आपण चांगली गृहिणी नाही हे शल्य मात्र बोचत होतं.
ज्या स्त्रियांना मी पाहिलं त्या सगळ्याच सुगरण, टापटीपीच्या अशा होत्या. त्यामुळे हे सगळे गुण अंगभूत असतात. आणि नसतील तर बाई म्हणून घ्यायला आपण fail अशीच काहीशी समजूत झाली होती.
पण गेले वर्ष दीड वर्ष मी कांचन दीक्षित यांचे फेसबूक वरचे लेख वाचत होते. त्यात त्या स्वैपाक घर, मुलं, आणि इतर गोष्टी कशा प्रभावीपणे सांभाळल्या जातात याचे काही मस्त उपाय सांगत होत्या.
मला गंमतच वाटली. स्वैपाक आणि स्वच्छता किंवा आवराआवर हे काही शिकवण्याचे विषय आहेत का? काहीतरीच. असं मला वाटलं.
पण मी त्यांचे लेख वाचत राहिले. अनेक लेख goal setting, किंवा भावनांवर नियंत्रण अशा प्रकारचे असायचे. ते मला जास्त भावले. हळू हळू कांचन मॅडम यांचा अभ्यास सखोल आहे हे लक्षात येऊ लागलं होतं.
आपणही हा कोर्स करून बघावा का? असा विचार मी करत होते. कारण इतर ठिकाणी कितीही दिवे लावले तरी आमचा घरात मात्र उजेडच होता.
शेवटी एक दिवस मी त्यांना व्हॉट्सॲप केले. Somehow त्यांना तो मेसेज मिळाला नाही. मग दोन महिने वाट पाहून finally मी त्यांना फोन केला आणि मार्च मध्ये हा कोर्स जॉईन होण्यासाठी fee भरली. त्याआधी आमच्या आँनलाईन स्वराज्य ग्रुप मधील आमची मैत्रीण मुग्धा राणे यांनी तो कोर्स केला आहे असे मला कळले. त्यांना विचारले तर त्यांनी जरूर करा असे सांगितले. पैसे वाया जाणार नाहीत याची खात्री दिली होती.
काल 19 मार्च रोजी कोर्स पूर्ण झाला. माझी कोर्स ची फी पहिल्याच आठवड्यात वसूल झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी revision आणि बोनस ठरल्या.
हा कोर्स मला प्रचंड आवडला.पण का? याचा विचार मी करायला लागले. मी घराचं व्यवस्थापन माझी आई,वहिनी यांच्याकडून का नाही शिकले?
याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एखादी गोष्ट जमली नाही तर काय ग बाई? कसं होईल हिचं सासरी? अशी आईची प्रतिक्रिया असायची. वहिनी अनेकदा , आता हे पण समजावून सांगायला हवं का? अशा आविर्भावात असायची.
पण कांचन मॅडम चूल आणि मूल यात अडकून राहायला लागू नये म्हणून याचं व्यवस्थापन करायचे अगदी सोपे कानमंत्र देतात. छोटीशीच गोष्ट आहे. करून बघू म्हणून आपण करतो. हवा तसा परिणाम मिळाला की आपला आत्मविश्वास आणि हुरूप दोन्हीही वाढतं.
स्वतः कांचन मॅडम यांचा अभ्यास सखोल आहे. त्या अतिशय ठामपणे आपल्याला recording मिळणार नाही म्हणून सांगतात.
पण कोर्स सुरू झाल्यावर त्यांच्यातील कळकळीची, आपल्या विद्यार्थिनींवर प्रेम करणारी शिक्षिका लक्षात येते. त्या शिकवताना नेहमीच मलाही आधी येत नव्हतं. मी करून पाहिलं असं सांगतात. तुम्ही सुद्धा करून बघा असं हळुवारपणे सांगतात.
एका शिक्षिकेला आपल्या विद्यार्थिनींना समजून घेऊन शिकवावं लागतं. त्यांना judge करून चालत नाही. त्या एक उत्तम शिक्षिका आहेत हे मी ठामपणे सांगू इच्छिते.
तुमच्या नात्यातील ओळखितील सगळ्या मुलींना लग्नाआधी हा कोर्स करायला सांगा. आजकाल शहरी मध्यंमवर्गीय मुली उच्चशिक्षित असतात. सहजच पोस्ट graduation केलेलं असतं. आणि निम्म्या मुली तर इंजिनिअर डॉक्टर आणि MBA केलेल्या असतात. या मुली घरात आईकडून शिकण्याला मर्यादा येतात. कारण अभ्यासावर खूप लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट class room setting मध्ये शिकण्याची सवय असते. शिवाय कांचन मॅडम शिकवताना प्रत्येक गोष्ट का आणि कशी करायची यामागचा कार्यकारण भाव उलगडून दाखवतात. आणि फक्त चूल आणि मूल यावर न थांबता सगळं आकाश कवेत कसं घेता येईल याचेही मार्गदर्शन करतात. ते आताच्या उच्चशिक्षित मुलींना जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण ब्रेसलेट शोधत असाल तर. बॉडी-हगिंगपासून ते स्ट्रक्चर्ड, कफपासून चेन आणि कफपर्यंत प्रत्येक लुकसाठी काहीतरी आहे.
कांचन मॅडम तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी आज लगेच स्वतःला चांगली गृहिणी म्हणणार नाही. परंतु मी बनू शकते. आवश्यक ती कौशल्य मी प्राप्त करू शकते हा आत्मविश्र्वास तुम्ही दिलात. त्याबद्दल मी तुमची अपार ऋणी आहे.
तुमचा कोर्स ही काळाची गरज आहे. तुमच्या सगळ्या विद्यार्थिनी आकाशाला गवसणी घालण्याचा आत्मविश्वास तुमच्या कोर्स मधून घेऊन जातात.
त्या सगळ्यांनी उत्तुंग काम करून तुमची यथोचित गुरुदक्षिणा द्यावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
© स्वाती अभंग
प्रिय कांचन ताई,
कशा आहात…?? मी तुमच्या नोव्हेंबर 2021च्या batch मधील एक student सौ विभावरी गोडबोले.आपला कोर्स करून साधारण पंधरा दिवस झाले. स्वतः मधील सकारात्मक बदल आणि खूप काही तुमच्याशी share करावेसे वाटले.
Facebook वरील आपण लिहिलेल्या post मी कायम वाचत असे आणि त्यातूनच online time management कोर्स करण्याचे नक्की केले.
कोर्स मधील sessions सुरु झाले आणि मी पाहता पाहता connect होत गेले. तुमच्या रूपात मला एक छान मैत्रीण मिळाली जिने मला माझ्या आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. मला स्वतःवरती प्रेम करायला शिकवले. माझ्याकडे असलेल्या कौशल्यांची आणि क्षमतांची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार….
तुमच्या कोर्स मधून तुम्ही फक्त Time Mangement नाही तर आयुष्य कसे manage करावे हे शिकवलेत.
आजूबाजूच्या व्यक्ती, नातेसंबंध, प्रतिकूल परिस्थिती, जीवनातील चढ उतार आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आपण ‘ स्वतः ‘हे सर्व हाताळण्याचे कौशल्य आणि आनंदी, समाधानी राहण्याचे सूत्र मला सापडले.
दीर्घश्वसन, मेडिटेशन यांचा फायदा जाणवला. महत्वाचे म्हणजे की आपली energy दिवसभर कशी वापरावी याच्या साध्या सोप्या टिप्स मिळाल्या. मनाचा अभ्यास हा विषय तुमच्या इतक्या सोप्या शब्दात आत्तापर्यंत कुणी समाजावला नव्हता. छोटया छोटया गोष्टींमध्ये बदल करून मी productive आणि तणावमुक्त झाले.
आत्तापर्यंत काही पुस्तकं, youtube वरील video यामधून काही माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे planing & organising करण्याचा प्रयत्न करत होते.
पण ‘कळतंय पण वळत नाही ‘अशी अवस्था होत होती.आणि एक अनामिक ताण येत होता. पण कोर्स नंतर आपण दिलेल्या tips आणि tricks मुळे हा विषय सोपा आणि सहज वाटू लागला.
Session च्या शेवटी आपण दिलेल्या homework मुळे लिखाणासोबतच चिंतन केले गेले.आयुष्याचा आलेख मांडून आपण आत्तापर्यंत काय मिळवले याचा पहिल्यांदा कागदावर हिशोब मांडला. ‘कृतज्ञता आणि समाधान ‘हा भाव रोजच्या जीवनात कसा अंगीकारावा हे समजले.
स्त्री च्या जिव्हाळ्याचे विषय म्हणजे घरकाम, स्वयंपाक आणि स्वच्छता. या विषयातील एकरसूरीपणा संपून रोजची कामे intresting वाटू लागली आहेत. आठवड्याचे, महिन्याचे नियोजन केल्याने आता कामांचा डोंगर साठत नाही. मला माझ्या आरोग्यावरसुद्धा खूप चांगला बदल जाणवला. मी आतून शांत आणि स्थिर झाले, झोप शांत लागू लागली.
आता रोज सकाळी उठल्यावर मी एकदम उत्साही, नव्या दिवसासाठी तयार असते. हे सगळे फक्त तुमच्यामुळे होऊ शकले…. खरंच…. Thank you so much….
आत लवकरच reunion चे session arrange करा अशी विनंती म्हणजे परत एकदा आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल.
लवकरच परत भेटू…..
सौ विभावरी गोडबोले – 10 डिसेंबर 2021
Dear Kanchan Madam,
I have found you like a “Light house “at exact time where I need self help at the age of 45 yrs.
I am following your Facebook posts from January 23 which gives a lot of hope, courage, support to many womens. It also gives assurance that ” with awareness and follow up of own, I can do many things in an easy way”
Your urge to teach and share knowledge is really remarkable.. It touches everyone’s heart quickly…
I wish best luck to your wonderful work which is directly contributing to society .
Thank you very much
Rajani S Hardas, Pune