जे आहे ते स्विकार कर!Accept it!

एखाद्याची समजूत काढताना, धीर देताना, असा सल्ला ब-याचदा दिला जातो, आपणही घेतो, देतो. बोलणं सोपं असतं, हे स्विकारणं कठिण असतं. हे स्विकारणं म्हणजे,

  • व्यक्ती किंवा परिस्थितीपुढे नमणं स्वतःची मतं,
  • विचार संपवणं.
  • माघार घेणं.
  • अन्याय सहन करणं
  • मान्य करणं
  • हार मानणं

अशा अर्थानं घेतलं जातं, थोडक्यात संपुर्ण पराजय स्विकारुन गप्प बसणं म्हणजे स्विकार करणं असा आपला समज असतो.

माझ्या एका Mentor ने एक गोष्ट सांगितली होती तिच्या मदतीनं आज आपण स्विकार करणं म्हणजे काय ते समजून घेऊ. एका गावात सोनाराचं छोटंसं दुकान होतं, ब-याचदा गावातल्या वयस्कर स्त्रिया दुरुस्तीचं किंवा काहीतरी बारिकसारीक काम घेऊन याच्याकडे यायच्या जुन्या कापडाच्या पुरचुंडीत, छोट्याशा डबीत, वेढण्या, साखळया यांचा गुंता असायचा. ते पाहून सोनार जाम चिडायचा कारण काम करण्यापुर्वी हा गुंता सोडवत बसायचा त्याला कंटाळा यायचा, नाही म्हणता यायचं नाही आणि रागारागात गाठी आणखी पक्क्या व्हायच्या. अधूनमधून त्याची बायको घरचं काम आटोपून मदतीला यायची, ती मात्र चुटकीसरशी या गाठी सोडवायची, तो तिच्या या कामानं आश्चर्यचकित व्हायचा. ती हसत कापड अंथरुन त्यावर सगळा गुंता ठेवायची, मग क्षणभर डोळे मिटून कामाला सुरुवात करायची.

एकदा त्यानं विचारलं, “तू कशी गं सहज सोडवतेस या एकमेकात अडकलेल्या साखळ्या ? काय बोलतेस मनात ?” ती म्हणाली, “मी आधी त्यांना म्हणते, मी तुमचा स्विकार करते मग शांतपणे कामाला सुरुवात करते ” स्विकार म्हणजे नकाराच्या विरुध्द ! आपण व्यक्ती परिस्थिती नाकारत असतो  आणि आपल्याला बदलही हवा असतो. दोन्ही कसं शक्य आहे? यात गुंता आणखी वाढतो. बदलासाठी म्हणजे गुंता सोडवण्यासाठी आधी स्विकार करणं म्हणजे समस्या हातात घेणं, जवाबदारी घेणं. लेख प्रायोजित आमच्या रंगीबेरंगी, चमकदार आणि स्टायलिश सॉक्सच्या संग्रहात प्रत्येकासाठी काहीतरी शोधा. तुमच्या ड्रॉवरमध्ये रंग जोडण्यासाठी वैयक्तिकरित्या किंवा बंडलमध्ये खरेदी करा!

जसं आहे तसं स्विकारणं ही समस्या सोडवण्याची पहिली महत्वाची स्टेप आहे, तीच टाळून ब-याचदा आपण उपाय शोधत फिरतो आणि फुकट दमतो. वर्षानुवर्ष समस्येशी लढतोय पण ती सुटतच नाहीये यामागे मनात काय आहे ते तपासा.

(उदा. सोनार मनात पुटपुटतो, “या बायका अशा साखळयांचा गुंता का करतात? नीट ठेवता येत नाही का?साधं कळत नाही का?अडाणी लोकं नुसती…!)

  • असं होऊच कसं शकतं!
  • असं झालंच कसं!
  • मीच का!
  • मलाच का!

मनात अजून हेच चाललं असेल तर अजून आपण समस्येचा आहे तसा स्विकारच केलेला नाहीये हे कळेल. स्विकार केल्यानं वास्तव स्पष्ट दिसायला लागतं, जवाबदारी घेतल्यानं आतून बळ मिळतं आणि मार्ग दिसू लागतात. ब्रम्हांडही मदत करायला लागतं कारण कामाला सुरुवात झाली कळताच आता नेमकी कोणती मदत पाठवायची हे त्याला स्पष्ट होतं, कदाचित या स्विकाराच्या स्पष्टतेचीच वाट पहात ते थांबलेलं असतं.

©कांचन दीक्षित

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला जळजळ होते का?

ह्यॅ ! मुळीच नाही, मी तसली/तसला नाही!

बरं आता प्रश्न बदलू

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला त्याची लायकी नसताना त्याला ते मिळालंय असं वाटतं का?

हो, म्हणजे असं वाटतं खरं… म्हणजे असं का वाटू नये, तो माणूस चीड येईल असाच असतो तेव्हा असं वाटणारच ना…

कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्ही, नाराज होत असाल अन्याय समजत असाल त्याचा राग राग करत असाल तर LOA नुसार तुम्ही स्वतःच्या मार्गात मोठेमोठे धोंडे टाकत आहात! ब्रम्हांडाचं सगळ्यांवर सारखं प्रेम आहे, लाडकं दोडकं असं काही नाही, जसे तरंग Vibrations, जशी तुमची energy तशी प्रतिक्रिया हा LOA चा नियम आहे.

ज्यांचा संताप येतो ते मजा करताना बघून आपल्याला वाईट वाटत असेल तर एक समजून घेऊया की, ते असं काहीतरी करताहेत ज्यामुळे ब्रम्हांड त्यांना ते सगळं देतंय जे पाहून बघणा-यांचा आणखी जळफळाट होतोय!

ते काय असू शकेल?

कदाचित आपल्याकडे सगळं आहे या समाधानाच्या भावनेत ते असतील, त्यामुळे इतरांना काही देतांना, दान करताना ते खुल्या मनानं देत असतील, स्वतःचा विचार करत असतील,आरोग्याची काळजी घेत असतील तर ही एक प्रकारची कृतज्ञता आहे ज्यानं LOA दुपटीनं काम करतो.कारण जे मिळालंय त्याची व्हॅल्यू आपण करत नाही पण ते करतात म्हणून ब्रम्हांड त्यांना झुकतं माप देत असेल.

त्यामुळे देवच अन्याय करतो, या जगात न्यायच नाही, आई धाकट्या भावाचेच लाड करते माझे नाही असं म्हणणा-या रुसलेल्या लहान मुलासारखी चरफड न करता सूक्ष्म निरिक्षण सुरु करा.जगात कुणालाही पात्रतेपेक्षा जास्त किंवा कमी काही मिळत नाही, आज मजा करणा-याचा भूतकाळ कसा होता? आपल्याला माहीत नाही, त्यानं आत काय भोगलंय आपल्याला माहीत नाही, त्यानं काय त्याग केलाय, संघर्ष केलाय आणि भविष्यातल्या कशावर पाणी सोडलंय किंवा भविष्यात त्याला त्याची काय किंमत चुकवावी लागेल हे *आपल्याला* या जन्मात कळायला मार्ग नाही, मग कशाला जज करा, कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवायची!

मजा मजा करत खिदळणा-यांना ती मजाच सजा झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत, तेव्हा मला त्यांचं किती छान असं वाटायचं पण आज मला त्यांची दया येते आणि ते न देऊन देवानं आपल्याला वाचवलं म्हणत मी देवाला थँक्यू म्हणते. कुणाचंही सुख पाहून तुम्ही फक्त ते Ok केलंत, तक्रार केली नाही, चरफड केली नाही तर ब्रम्हांड हसत म्हणतं.

“आवडलं ना? घे तुला पण”

तेच आपण, ह्यॅ !केलं, हे चूक आहे म्हटलं, त्याला मिळायला नको होतं म्हटलं, की त्याला मिळेल न मिळेल आधी तुमचा पत्ता कट होईल. ब्रम्हांड म्हणेल, याला मी दिलेलं अमुक अमुक आवडत नाहीये याला देऊ नका, त्याला आवडतं ते द्या.

काय आवडतं?

  • जळफळाट करायला आवडतं, म्हणूनच सारखा करतो. Ok पाठवा रे आणखी माणसं त्याच्या आयुष्यात, दाखवा त्याला सगळी आनंदात जल्लोष करणारी माणसं…मुबलक, भरपूर …
  • कर भरपूर जळफळाट,
  • ब्रम्हांड म्हणजे मुबलकता, भरपूर …
  • काय हवंय ते मिळेल, ते सांगण्याची भाषा आहे फिलिंग्स Vibrations
  • तुमच्या भावना ऐकतं ब्रम्हांड, मग भावना कशा हव्यात,
  • तर कृतज्ञतेच्या आणि समाधानाच्या.
  • कौतुकाच्या आणि प्रशंसेच्या…
  • God Bless You मंत्र म्हणत रहायचं, कुणालाही पाहून कितीही चरफड होत असली तरी, काय?

©कांचन दीक्षित

जगताना ईतरांच्या सहकार्यानं/मदतीनं पुढं जाणं (Delegate) हा विषय Urgent But Not Important कामं शिकवताना येतो. प्रत्येक घरात घरभर पसरलेला पसारा आवरत बसणारी एखादी व्यक्ती असते, (स्त्री पुरुष कुणीही) हिला सगळं जागच्या जागी आवडत असतं, टापटिप रहाण्याची सवय असते, मुळात ही व्यक्ती सुव्यवस्थित रहाण्याप्रति संवेदनशील असते, संवेदनशील म्हणजे वस्तूंचे ट्रिगर्स कॅच करणारी. वस्तू विचार आणि भावना ट्रिगर करतात, चहाचा कप, फूटबाॅल, क्रिकेटची बॅट …एक एक वस्तू विचारांची मालिका देतात. Minimalism जीवनशैलीत हेच ट्रिगर्स कमी करुन शांत क्रिएटिव वातावरण तयार केलं जातं.

हा जागृती आणि विकसित मनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न असतो तो त्यांचा प्राॅब्लेम असतो कारण बाकीच्यांना काहीच वाटत नसतं, भावनांवर आणि संवादावर(कम्युनिकेशन)काम करुन यावर उपाय मिळवता येतो. आजूबाजूची माणसं ब-याचदा तंद्रीतच जगत असतात ते असून नसतात, हरवलेले असतात, आजकाल तर फोन एक मोठ्ठं कारण आहे, त्यामुळे पसारा हा विषय एखाद्याच्या लक्षातही येत नाही असं असू शकतं. शिवाय सवयी वर्तन नियंत्रित करतात.

उपाय

1) भावनांची जवाबदारी घ्या

  • आपल्याला जे दिसतंय आणि त्यामुळे जे वाटतंय (feelings) त्याची जवाबदारी आपली आहे हे आधी स्विकारा. राग येणं, चिडचीड, बडबड …
  • घरभर वस्तू पसरुन ठेवता मी एकटीनंच/एकट्यानंच करायचं का !
  • साध्या चपला काढल्यावर कपाटात ठेवता येत नाही का!
  • ग्लास विसळून का नाही ठेवला!
  • सकाळपासून कप तिथेच पडून आहे!
  • चादरीची घडी सुध्दा केलेली नाही!
  • राहू दे की तुला कोणी सांगितलंय!
  • काय कटकट आहे !
  • शिस्तीचा वैताग आलाय!
  • मनासारखं जगता येत नाही!
  • अशा तक्रारी आणि वादानं मूळ विषय तसाच रहातो, ही मालिका सुरुच रहाते.
  • हा त्रागा आणि मनस्ताप काहीच बदल करु शकत नाही कारण या हल्ल्यामुळे समोरचा बचावाची भूमिका घेतो आणि उलट स्वतःचं समर्थन करायला लागतो.
  • राग, चिडचीड आणि नैराश्य या प्रतिक्रिया माझ्या आहेत, कुणीही मी परवानगी देत नाही तोवर माझ्या भावना दुखावू शकत नाही कारण माझे विचार भावना निर्माण करतात आणि माझ्या विचारांवर मी काम करु शकतो/शकते.काय बोलायचं? कशी प्रतिक्रिया द्यायची याचे निर्णय माझ्या हातात आहेत.भावनांवर मी नियंत्रण ठेवू शकते/शकतो.
  • मला माझ्या भावनांवर काम करायचंय, समोरचा मला दुखावण्यासाठी कृती करत नाही.मला व्यक्तीचा नाही तर विशिष्ट वर्तनाचा राग आलाय आणि तेच पोहोचवायचं आहे ही स्पष्टता हवी.

2) संवादकौशल्य वाढवा

शब्दांवर आणि बोलण्यावर काम करायचं आहे. अहंकारावर हल्ला आणि टीका करुन, शिक्षा देऊन विरोध निर्माण होतो बदल नाही. बदलासाठी आपली बाजू समोरच्यानं समजून घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ती नीट पोहोचणं महत्वाचं असतं.

आपल्याला काय हवंय? समोरच्याला काय कळायला हवंय? तर आपल्या भावना ! कोणत्या? तर ईतरांची वैयक्तिक कामं करताना येणारा #थकवा, वेळ वाया जाण्याचं #नैराश्य घराची व्यवस्था बिघडल्यानं निर्माण होणारा #ताण…आई असेल तर संस्कार देण्यात कमी पडण्याचं #प्रेशर

थोडक्यात आपल्या भावना समोर पोहोचल्या पाहिजेत हे आपलं ध्येय आहे. उदा. तुला साधं कळत नाही चपला काढल्यावर कपाटात ठेवायच्या …तू अमुक सुध्दा असंच करतेस…परवा हेच… यानं काहीच साध्य होत नाही. यापेक्षा बदलाची थोडीतरी शक्यता/आशा देणारा दुसरा मार्ग पाहू.

3) भावना व्यक्त करणं

वस्तू ईकडेतिकडे फेकलेल्या दिसल्या की मला आवराव्या लागतात, आपण हेच करण्यात आयुष्य वाया घालवतोय याचं दु:ख होतं, स्वतःसाठी काहीच करायला वेळ मिळत नाही याचं वाईट वाटतं. (भावनांची जवाबदारी घेत स्वतःच्या भावना पोहोचवणं, बाजू सांगणं) तू या वस्तू दरवेळी जाग्यावर ठेवल्यास तर आपलं घर व्यवस्थित दिसेल, एनर्जी छान राहील असं मला वाटतं, मदतीनं माझं काम कमी होईल, आराम मिळेल, छान वाटेल. बघ जमलं तर. (अपेक्षा आग्रह न करता मांडणं, स्वातंत्र्य देणं.)

आता भावना पोहोचल्या पण समोरच्याच्या अहंकाराला वावच दिलेला नाही, तो बोलणार काय? त्याला आपणच बाजूला केलं, मधे येऊ दिलं नाही. ईथे लगेच नाही पण बदलाची शक्यता आहे, आपण ईतरांचं वर्तन नियंत्रित करु शकत नाही पण प्रभाव निर्माण करु शकतो influence करु शकतो, यापेक्षा जास्त अपेक्षा आणि हट्ट करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. काय करायचं नाही यापेक्षा काय करायचं हे सांगायचं, उपाय द्यायचे.

उदा. खेळणी ईकडे तिकडे फेकू नको यापेक्षा खेळणी या बास्केटमधे ठेवत जा हे बोलणं ट्रेनिंग होईल. यानंतरही *परिस्थिती, माणसं बदलत नसतील तर आपण आपल्या संवादकौशल्याचा अभ्यास वाढवायची, नव्यानं शिकायची गरज आहे ईतकंच समजून घ्यायचं आणि स्वतःला बदलायचं.*

(नाही पण …/ तरी पण… तो असा…, ती अशी… अशा कमेंटसला उत्तर देऊ शकत नाही, अजूनही ईतरांबद्दल तक्रारी असतील तर पोस्ट सोडून द्या. दुस-याला सुधारणं, धडा शिकवणं, अद्दल घडवून सरळ करणं यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते असं मला वाटतं, स्वतःला बदलून परिस्थितीत बदल करण्याची सुरुवात करायची असेल तर या पोस्टचा उपयोग होईल.)

© कांचन दीक्षित

  • स्विकार

    जे आहे ते स्विकार कर! – Accept it! एखाद्याची समजूत काढताना, धीर देताना, असा सल्ला ब-याचदा दिला जातो, आपणही घेतो, देतो. बोलणं सोपं असतं, हे स्विकारणं कठिण असतं. हे स्विकारणं म्हणजे, अशा अर्थानं घेतलं जातं, थोडक्यात संपुर्ण पराजय स्विकारुन गप्प बसणं म्हणजे स्विकार करणं असा आपला समज असतो. माझ्या एका Mentor ने एक गोष्ट सांगितली…


  • लाॅ ऑफ अट्रॅक्शन आणि जळजळ

    कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला जळजळ होते का? ह्यॅ ! मुळीच नाही, मी तसली/तसला नाही! बरं आता प्रश्न बदलू कुणाजवळ काही चांगलं पाहून तुम्हाला त्याची लायकी नसताना त्याला ते मिळालंय असं वाटतं का? हो, म्हणजे असं वाटतं खरं… म्हणजे असं का वाटू नये, तो माणूस चीड येईल असाच असतो तेव्हा असं वाटणारच ना… कुणाजवळ काही…


  • पसारा करणारे आणि आवरणारे !

    जगताना ईतरांच्या सहकार्यानं/मदतीनं पुढं जाणं (Delegate) हा विषय Urgent But Not Important कामं शिकवताना येतो. प्रत्येक घरात घरभर पसरलेला पसारा आवरत बसणारी एखादी व्यक्ती असते, (स्त्री पुरुष कुणीही) हिला सगळं जागच्या जागी आवडत असतं, टापटिप रहाण्याची सवय असते, मुळात ही व्यक्ती सुव्यवस्थित रहाण्याप्रति संवेदनशील असते, संवेदनशील म्हणजे वस्तूंचे ट्रिगर्स कॅच करणारी. वस्तू विचार आणि भावना…


कांचन दीक्षित ह्यांचे लिखाण ब्लॉगफेसबुक पेजवर उपलब्ध आहे.